Duration 11:00

Sajuk Tup Recipe | Pure clarified butter | मिक्सरच्या सहाय्याने झटपट बनवा घरच्या घरी शुद्ध साजूक तूप

292 514 watched
0
5.7 K
Published 14 Feb 2018

पुरणाची पोळी असो, मऊ खिचडी भात असो किंवा अगदी उकडीचा मोदक किंवा शिरा… या सार्‍या गोडाच्या पदार्थांची खरी लज्जत वाढते ती साजूक तुपाने. पचायला हलके आणि मंद सुगंधाचे साजूक तूप हे भारतीय आहारातील एक अविभाज्य घटक आहे. तूपाबाबत अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहे. त्यामुळे वेट लॉसच्या मिशनवर असणारे अनेक जण ते आहारात टाळतात. परंतू साजूक तूप वजन वाढीविण्यास नाही तर घटवण्यास मदत करते. सोबतच सौंदर्य सुधारण्यासही तूप फायदेशीर ठरते. चला तर मग या साजूक तुपाची झटपट तयार होणारी रेसीपी पाहूया. रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा आणि चॅनेलला स्बस्क्राइब सुद्धा करा. धन्यवाद ! साहित्य - १० - १५ दिवस साठविलेली म्हशीच्या किंव्हा गायीच्या दुधाची साय आणि थंडगार पाणी. कृती - एका मिक्सरच्या भांड्यात थोडी साय घेऊन त्यात सायीच्या दुप्पट थंड पाणी टाकून मिक्सरला चांगले फिरवून घ्या. मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर तुम्हाला त्यावर चांगली लोणी जमलेली दिसेल ती वरच्यावर अलगद उचलून बाजूला एका पातेल्यात काढून घ्या. उरलेली साय देखील मिक्सरला अशाच पद्धतीने फिरवून घ्या. आता पातेल्यात जमा झालेली लोणी पाण्याने ३-४ वेळा धुवून घ्या. लोणी चांगली धुतली गेली नसेल तर तुपाला मंद उग्र वास येतो त्यामुळे लोणी चांगली पाण्याने धुवून घ्यावी. आता लोणी धुवून झाल्यानंतर या पातेल्याला मंद गॅस वर चांगले तापवून घ्यावे. पातेलं तापल्यावर लोणी वितळायला सुरुवात होईल आणि त्यानंतर या लोणीला सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर लोणी वर येऊन ओतू जाईल. २० मिनिटांनी लोणीचे तेलासारख्या स्त्रावात रूपांतर होईल, आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यावा. आता आपले साजूक तूप तयार झाले आहे पण पूर्णपणे नाही. या तुपाला थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर त्याला चांगले एका बरणीत गाळून घ्यावे. आपले शुद्ध सुगंधीत घरगुती साजूक तूप तय्यार !

Category

Show more

Comments - 472